वर्ल्ड फूड इंडिया २०२३ – जागतिक अन्नधान्य प्रक्रिया उद्योग मधील नव्या संधी

भा​रतामध्ये मागील काही दशकांत वैविध्यपूर्ण अन्न प्रक्रिया उद्योग उदयास आलेला आहे. सेंद्रिय भाजीपाला, समुद्र संपदा, उच्चप्रतीची फळे, मांस आणि पोल्ट्री उत्पादने, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यासारख्या अनेक अन्न घटकांचा समावेश आहे. भारताची कृषी संपन्न असून उत्पादन क्षमता, निर्यात आणि मूल्यवर्धनाच्या दृष्टीने दरवर्षी वाढीची मोठ्या प्रमाणात क्षमता आहे. तसेच भारत हा खाद्यपदार्थांचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक देखील आहे. आज घडीला दूध, केळी, आंबा, पपई, पेरू, आले, भेंडी आणि म्हशीच्या मांसाच्या उत्पादनात भारत जगात अग्रस्थानी आहे. यासोबतच  सोयाबीन, तांदूळ, गहू, बटाटे, लसूण, काजू, चणे आणि अंतर्देशीय मत्स्य उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोंबडी अंडी, नारळ, टोमॅटो आणि मसूर उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपला देश अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी कच्च्या मालाची उपलब्धता, कुशल मजुरीची रास्त किंमत, देशांतर्गत बाजारपेठ, तसेच वाढती उत्पन्न पातळी आणि वाढत्या मागण्या यांचा भविष्यात चांगला फायदा करून घेऊ शकतो.

संपूर्ण जगाला समृद्ध भारतीय खाद्य संस्कृतीची ओळख करून देण्याच्या आज गरज आहे. देशातील विविध अन्न प्रक्रिया क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने वर्ष २०१७ मध्ये वर्ल्ड फूड इंडियाचे पहिले पाऊल टाकले होते. २०२३ हे दुसरे वर्ष जल्लोषात साजरे करण्याच्या दृष्टीने देशातील अन्नधान्य उद्योग आणि जागतिक अन्न प्रक्रिया उद्योग एकत्र आणण्याचे योजिले आहे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय नवी दिल्ली येथे यावर्षी दिनांक ३, ४ आणि ५ नोव्हेंबर २०२३ दरम्यान ‘वर्ल्ड फूड इंडिया २०२३’ या दुसऱ्या प्रदर्शन आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.​ भारताला जगाची अन्न प्रक्रिया हब म्हणून नावारूपाला आणण्यासाठी अन्न प्रक्रिया क्षेत्राची क्षमता पारखण्यात आली आहे. अन्न प्रक्रिया क्षेत्रात गुंतवणूक वाढदिवण्यासाठी विविध उपाय अवलंबले आहेत. यामध्ये फूड प्रोसेसिंग, प्रक्रिया उद्योग रिसर्च, कोल्ड चेन स्टोरेज, नवनवीन स्टार्ट अप, वाहतूक आणि रिटेल चेन यांचा समावेश केला आहे. या सर्व घटकांच्या मदतीने संपूर्ण अन्न प्रक्रिया मूल्य साखळी समाविष्ट करण्यात आली आहे.

या कार्यक्रमासाठी सरकारी प्रतिनिधी आणि प्रतिनिधी​, अन्न उत्पादनांचे निर्यातदार आणि आयातदार​, ​परदेश मिशन आणि दूतावास​, अन्न प्रक्रिया आणि उत्पादन कंपन्या​ तसेच, फूड स्टार्टअप्स आणि इनोव्हेटर्स​, मशिनरी बनविणाऱ्या कंपन्या, पॅकेजिंग कोल्ड चेन आणि ​वाहतूक कंपन्या​, गुंतवणूकदार, व्यापार आणि मीडिया भागीदार​, आर्थिक संस्था​, शैक्षणिक आणि संशोधन संस्था​ विशेष करून आमंत्रिक केले आहे. एक कार्यक्षम आणि सर्वसमावेशक परिसंस्थेसाठी अडथळे दूर करणे आणि एक समन्वित आणि एकात्मिक फ्रेमवर्क स्थापित करणे ​यामुळे शक्य होणार आहे.​ या तीन दिवसात रोजगार निर्मितीवर भर ​देऊन शाश्वत आणि सर्वसमावेशक परिसंस्था स्थापन करण्यासाठी केला जात आहे.​ यामुळे देशातील ​व्यापार आणि कंपन्यांना चालना मिळून भरभराटी होईल ज्यामुळे समाजातील सर्व ​सामान्यांपर्यंत याचा फायदा ​​होईल.​ याशिवाय विदेशी गुंतवणुकीला आकर्षित ​करण्याच्या दृष्टीने थेट गुंतवणुकीचे दरवाजे उघडले आहेत आणि व्यवसाय सुलभता ​येण्याची स्थिती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. ​सोबतच ​सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योग​, ​महिला बचत गट​, ​शेतकरी उत्पादक संस्थांच्या​ सहभागास सुलभ करण्यासाठी विविध योजनांना चालना देत आहे. ​देशाची ​भौगोलिक ​रचना लक्षात घेऊन डोंगराळ प्रदेशांसाठी विशेष प्रोत्साहन दिले जात ​असून ​त्यांच्यासाठी बाजारपेठ आणि आर्थिक ​व्यवहार सुलभ केला जात आहे.

हा आहे यावर्षीच्या ​भारताच्या अन्न प्रक्रिया उद्योगा​चा नवा अवतार​ (WFI 2023 Brand Mascot​ Mill-Ind​)​. भारताला ‘द फूड बास्केट ऑफ वर्ल्ड’ बनवण्यासाठी जागतिक गुंतवणूक केंद्र​.​ ‘आंतरराष्ट्रीय अन्नधान्य वर्ष’ जगा​साठी भविष्यातील अन्न बास्केट​ बनविण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ठरणार आहे. सहभागी होण्यासाठी रेजिस्ट्रेशन अनिवार्य आहे, त्याची शाखेला माहिती खाली दिली आहे.

coffee bean processing

कार्यक्रमाचे महत्वाचे टप्पे

world food india opportunity

कार्यक्रम पत्ता

प्रगती मैदान, नवी दिल्ली, ११०००१, भारत.

पोहोचण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन्स

इंद्रप्रस्थ मेट्रो स्टेशन – View Map
सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन – View Map

Exit mobile version