आज सरकारी नोकरी आणि स्पर्धा परीक्षा यांमध्ये करिअर स्थेर्यासाठी तरुण जास्त वेळ देत आहे. साधारण नोकरी मिळवणे पूर्वीपेक्षा आज अधिक स्पर्धात्मक आव्हानांनी भरलेले आहे. सरकारी नोकरी इतकेच आयटी क्षेत्रातही काही तरुण उंच भरारी घेत आहेत. तरुणांनी शैक्षणिक सर्वोत्तम प्रगती करून एक पाऊल पुढे टाकले आहे. ग्रामीण भागातील होतकरू तरुण देखील आज आयटी क्षेत्रात हिरीरीने सामील होताना दिसतो. बुद्धीचा चातुर्याच्या या आधुनिक काळात नवीन आव्हाने आणि संधी तरुणांसाठी करिअरचा टप्पा ठरत आहे.
ग्रामीण तरुणांनी शाश्वत रोजगार मिळवण्यासाठी संवाद, सहकार, व्यावसायिक शिष्टाचार, आर्थिक आणि डिजिटल साक्षरता कौशल्यांनी सुसज्ज होणे ही काळाची गरज आहे. अशीच एक नामी संधी नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एन्हांस्ड लर्निंग NPTEL आणि आयटी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी टाटा कन्सल्टंसीच्या संयुक्त विद्यमाने मिळत आहे. TCS iON चा करिअर एज यंग प्रोफेशनल हा १५ दिवसांचा करिअर अभ्यासक्रम विनामूल्य देत आहे. ज्याची रचना आजच्या तरुणांना भविष्यासाठी मुख्य रोजगार कौशल्यांसह तयारी करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. अशा संधींचा ग्रामीण तरुणांनी नक्कीच फायदा करून घेतला पाहिजे.
या मोफत कोर्सबद्दल
टाटा कन्सल्टंसीच्या धोरणात्मक युनिटने TCS iON पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व नोकरी शोधणार्यांना हा ऑनलाइन कोर्स, करिअर स्किल्स, मोफत देण्यात आला आहे. नॅशनल करिअर सर्व्हिस (NCS) यांच्या सहकार्याने तयार केले आहे. हा अभ्यासक्रम शिकणाऱ्यांना सॉफ्ट स्किल्स प्रभुत्व प्राप्त करता येणार आहे. त्यांची रोजगारक्षमता वाढवण्यासाठी तसेच दीर्घकालीन करिअरच्या प्रगतीसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
शिवाय हा अभ्यासक्रम हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. भाषेच्या आवडीनुसार अभ्यासक्रम निवड करण्याची मुभा देण्यात अली आहे. प्रत्येक मॉड्युलमध्ये व्हिडिओ, केस स्टडी आणि शिक्षण मोजमाप मूल्यांकन दिलेले आहे.
कालावधी: २ आठवडे, ७–१० तास दर आठवड्याला. कोणाला फायदा होईल? पदवीधर आणि पदव्युत्तर, फ्रेशर्स. पूर्वतयारी: अभ्यासक्रमात सहभागी होण्यासाठी कोणतीही पूर्व अटी नाहीत.
काय शिकायला मिळणार
- स्वयं-विकास कौशल्ये जी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची देतील.
- प्रभावी सामग्री आणि सशक्त विषय रेखासह एक प्रभावी ईमेल तयार करणे.
- गट चर्चेत सक्रिय सहभाग घेऊन चिरस्थायी प्रभावी स्किल शिकणे.
- प्रचलित आणि अप्रचलित संवादाचे महत्त्व.
- अभ्यासक्रमाच्या शेवटी, विद्यार्थ्याला TCS iON कडून पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिले जाते.
अकाउंटिंग, IT आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसमधील मुख्य वर्तणूक आणि संप्रेषण कौशल्ये आणि पायाभूत कौशल्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. TCS iON करिअर एज – यंग प्रोफेशनल मधील शिक्षण १४ मॉड्युल्समध्ये शिकविले जाते. व्हिडिओ, सादरीकरणे, वाचन साहित्य, TCS तज्ञांद्वारे रेकॉर्ड केलेले वेबिनार आणि मॉड्युलचे शेवटी स्वमूल्यांकन जे विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण बनवतात. १५ भाग असलेले हे प्रत्येक मॉड्यूल १ ते २ तासांचे असणार आहे. अभ्यासक्रमाचे अंतिम मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या संकल्पनांच्या आकलनाचे मूल्यांकन करते. अभ्यासक्रमाची उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर विद्यार्थ्याला प्रमाणपत्र प्राप्त होते. याव्यतिरिक्त, शिकणाऱ्यांना डिजिटल चर्चा सत्रात प्रवेश मिळतो ज्याद्वारे प्रश्न मांडता येतात. टेक्निकल टीम थोड्याच वेळात आलेल्या प्रश्नांना समाधानपूर्वक उत्तर देतात. शिवाय, या कोर्ससाठी मोबाईल किंवा लॅपटॉप अशा कोणत्याही माध्यमांतून सहभागी होता येते.
रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिंक TCS iON & NPTEL Course
thanks, nice information. applied to the course.