महा योजना

विठ्ठल रुक्मिणी वारकरी ​विमा छत्र योजना

खंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि समस्त वारकरी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री पांडुरंगाच्या दर्शनाची आस सर्वानांच लागून राहिली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्या ​पंढरपूरच्या ​दिशेने मार्गस्थ झालेल्या आहेत. त्यासोबतच महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून अनेक लहान मोठ्या दिंड्या आणि संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. पायी वारीचा अनुभव घेण्यासाठी लाखे भक्तगण विविध माध्यमांतून सहभागी झालेले असतात. या प्रवासात काही जणांना वयोमानानुसार त्रास झाल्यास औषधोपचार करण्याची सोया ठिकठिकाणी केलेली असते. 

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांच्या होणाऱ्या गैरसोयींबद्दल दखल घेतली आहे. वारी प्रमुखांच्या एकत्रित मांगणीनुसार ​​​आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी ​​विमा छत्र’ योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री ​साहेबांनी ट्विटर द्वारे केली आहे.

eknath shinde twitter

महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, आणि समस्त शेतकरी वर्गाने या योजनेचे स्वागत केले आहे.

Related Articles

​पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या ​लाखो वारकऱ्यांना या निर्णयामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. मदत व पुनर्वसन विभागामार्फत​ पायी वारीच्या​ संपूर्ण​ ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण ​देण्यात आले आहे

विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र ​योजना माहिती:

  • दिंडीतील वारकऱ्याचा दुर्दैवी ​अपघाती ​मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये अनुदान देण्यात ​येणार आहे.
  • वारकऱ्यास कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील.
  • पायी वारकऱ्यास ​अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये देण्यात येतील​.​
  • आजारी ​वारकऱ्यास हॉस्पिटल औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च ​देणार आहेत.

दर्शन बुकिंगची सुविधा

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने बऱ्याच वर्षांपासून मोबाईलवरून दर्शन बुकिंगची सुविधा उपल्बध करून दिली आहे. मोबाईलमधून दर्शनाची दिवस आणि वेळ निवडून ऑनलाईन बुकिंग करता येते. वेळेची गैरसतोय टाळण्याकरिता निवडलेल्या दिवशीच दर्शन घ्यावे. एरवी लागणार खुपसारा वेळ या सुविधेमुळे कमी होत आहे. त्यामुळे श्री विठ्ठल भक्तांनी पंढरपूरला येण्याचे ठरवले असेल तर आपल्या येण्याचा दिवस निश्चित करून त्या वेळेचे दर्शन पास आधीच बुक करावा. दर्शन पास बुक करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आपली सर्व माहिती द्यावी . आणि दर्शनास येताना आपले ओळखपत्र (आधारकार्ड ) सोबत ठेवावे. ज्यामुळे दर्शन पासचा गैरवापर होणार नाही.

ऑनलाईन तिकीट बुकिंग तिकीट प्रिंट करण्यासाठी लिंक

पायी वारकऱ्यांना विठ्ठल रखुमाईचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी शासनाने आणखी पाऊले उचलायला हवी अशी प्रतिक्रिया समस्त वारकरी संप्रदायाकडून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button